पुणे : बहुजननामा ऑनलाइन – फसवणूक (Fraud ) प्रकरणात आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या पतसंस्थेने पावणे दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख 19 हजार रुपयांची फसवणूक केली असून त्यांना या प्रकरणात अटक केली आहे.
सुनीता राजेंद्र नाईक (रा. धनकवडी) असे अटक केलेल्या अध्यक्षाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे.
धनकवडी भागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेचे लेखा परीक्षण करण्यात आले. यात पतसंस्थेच्या संचालक व इतरांनी अपहार करत ठेवी ठेवलेल्या रकमा काढून त्याचा परस्पर अपहार केला, असल्याचे दिसून आले होते. यानंतर पुणे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. (Fraud) केली असल्याचे म्हंटले आहे. आतापर्यंत आलेल्या नागरिकांची ही नोंद असून, जवळपास 7 कोटी 19 लाख 14 हजार 339 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. या तपासात पोलिसांनी सुनीता यांना अटक केली आहे. सुनीता यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कृपया हे देखील वाचा :
देहुरोडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार
आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार