पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Rape case : एका तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान (वय १९, रा. शितळानगर, मामुर्डी, देहुरोड), सुलतान ऊर्फ मुश्ताक सलीम सय्यद (वय ३२), रियाज ऊर्फ मन्नन जावेद खान (वय १९) आणि सोहेल शेरअली पिरजादे (वय २१, रा. आंबेडकरनगर, मामुर्डी, देहुरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बिट्टु ऊर्फ हमीद जावेद खान, झायेद ऊर्फ रॉयल निंजा ऊर्फ सोन्या रशिद खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ पासून ३१ मे २०२१ पर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोमान खान याने फिर्यादी तरुणीला धमकी देऊन तिच्यावर जानेवारीमध्ये बलात्कार केला. या दोघांचा सुलतान याने व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी वेळोवेळी तिच्या वर बलात्कार केल. तसेच अनैसर्गिक संभोग केला. हा प्रकार ३१ मेपर्यंत सुरु होता. नोमान याने तिला मारहाण करुन व दमदाटी करुन तिला व तिच्या घराच्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अनैसर्गिक बलात्कार केला. या छळाला कंटाळून शेवटी तिने हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. देहुरोड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार