Pune Fire News | कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग

Mahajan Wada Kasba Peth

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire News | कसबा पेठेतील जुन्या लाकडी वाड्याला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. वाडा बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. (Pune Fire News)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे मंगल कार्यालयाजवळ जुना महाजन वाडा (Mahajan Wada) आहे. गेली २० ते २५ वर्षे वाडा पडीक आहे. या तीन मजली वाड्याला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. संपूर्ण वाड्याने पेट घेतल्यानंतर त्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. लाकडी वाडा असल्याने आगीने लवकर पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या व टँकर घटनास्थळी पोहचले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. (Pune Fire News)

https://www.instagram.com/reel/C0sympzIFzz/?utm_source=ig_web_copy_link

परंतु, आग अगोदर पूर्ण भडकली होती. संपूर्ण वाड्याने पेट घेतला असल्याने या आगीत संपूर्ण वाडा जळून खाक झाला आहे. वाड्याचा संपूर्ण कोळसा झाला आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.