पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कार रिव्हर्स घेताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्याच्या अंगावर गाडी गेली. त्यात त्याचा मृत्यु (Death) झाला. तब्बल पाच महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून कारचालक महिला डॉक्टरवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
डॉ. अश्वीनी आदित्य साळुंखे Dr. Ashwini Aditya Salunkhe (रा. मार्वल झेटा सोसायटी, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालक महिलेचे नाव आहे. अल्लाबक्ष अन्वर शेख (वय ४२, रा. येरवडा) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. हा प्रकार चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील रिलॅक्स पॉईंट हॉटेलसमोर रस्त्याच्या कडेला ७ जून २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला होता. (Pune Crime)
याबाबत पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (Sub-Inspector of Police Arvind Kumre) यांनी चंदननगर
पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील जुना मुंढवा रोडच्या कडेला ७ जून रोजी अल्लाबक्ष हा दारु पिऊन झोपला होता. त्याच्या अंगावरुन अज्ञात वाहन गेल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला होता. अकस्मात मृत्यु अशी नोंद करुन पोलीस तपास करीत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. अल्लाबक्ष शेख हा रस्त्याच्या कडेला झोपला असताना डॉ. साळुंखे या त्यांची कार रिव्हर्स (Car Reverse) घेत असताना मागे ती शेख याच्या अंगावर गेली. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Crime | When the car is in reverse; A case has been registered against the woman doctor
हे देखील वाचा :
Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप
Pune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना