पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Yerawada Central Jail Pune) न्यायाधीन बंद्याने (Prisoner) गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) घटना घडली आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. समाधान कांतीलाला सावंत Samadhan Ksntilal Sawant (वय-26 रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या न्यायाधीन बंद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (Pune Crime) केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Sheikh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस स्टेशन (Indapur Police Station) कडील पॉक्सो गुन्ह्यातील (Pocso Act) न्यायाधीन बंदी समाधान सावंत याला 24 जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरत्या कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर न्यायाधीन बंदी म्हणून 30 जानेवारी रोजी टिळक सेपरेट यार्ड (Tilak Separate Yard) येथील खोली क्रमांक 37 मध्ये इतर तीन आरोपींसह ठेवण्यात आले होते. सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास समाधान याने टॉवेलच्या सहाय्याने कारागृहाच्या खोलीतील दरवाजाच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. (Pune Crime)
यावेळी कारागृह विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले.
मात्र तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कारागृह विभागाच्या नियमानुसार ससून रुग्णालायात (Sassoon Hospital) शवविच्छेदन करुन मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav), कारागृह विभागाच्या अधीक्षक राणी (Yerawada prison superintendent Rani Bhosale) भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव (PSI Bhagwan Gurav) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | suicide by hanging of a prisoner in yerwada jail in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 6107 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 964 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी