सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान (Sindhudurg District Bank Election) शिवसेनेच्या (Shivsena) संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी ( Santosh Parab Attack Case) भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) हे अडचणीत आले आहेत. नितेश राणे (Nitesh Rane) यांना सध्या न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी (Regular Bail) सिंधुदुर्ग न्यायालयात (Sindhudurg Court) सुनावणी (Hearing) पार पडली. यावेळी संतोष परब यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती, ती हल्लेखोरांना कुणी दिली? असं म्हणत सरकारी वकिलांनी नितेश राणे यांच्याकडे बोट केले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांना आजही सत्र न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यामुळे राणे यांच्या न्यायालयीन कोठडीत मुक्काम आणखी वाढला आहे. या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी नितेश राणे धावाधाव सुरुच आहे. आज पुन्हा एकदा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. परंतु जामीन अर्जावर सुनावणी केली नाही. ही सुनावणी उद्या 11 वाजता होणार आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत (Public Prosecutor Pradeep Gharat) यांनी आज न्यायालयात नितेश राणे यांच्यावर धक्कादायक आरोप केला. नितेश राणे हे जरी आमदार आहेत. तरी देखील वारंवार गुन्हे करण्याची त्यांना सवय झाली आहे. मारेकऱ्यांकडे दीड लाखाची सुपारी दिली गेली, त्यातील 10 दिले गेले हे सचिन सातपुतेने (Sachin Satpute) 3 नंबरच्या आरोपीला दिली, असा दावा घरत यांनी केला.
तसेच तपास अजून पूर्ण झालेला नाही. कोर्टात चार्जशीट (Chargesheet) दाखल नाही त्यामुळे जर नियमित जामीन मंजूर झाल्यास हल्ला प्रकरणात (तपासात) अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जामीन मंजूर करु नये अशी देखील मागणी सरकारी वकिल घरत यांनी न्यायालयाला केली.
दुसरीकडे नितेश राणे यांचे वकिल मान शिंदे (Adv. Man Shinde) यांनी संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम नसल्याचे म्हटले. मात्र संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम होती. छातीवर गंभीर जखमा करुन मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. अंगावर गाडी घालून पडल्यावर परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली, परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट असल्याचा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी केला.
तसेच मारेकऱ्यांनी राणेशी संपर्क केला होता त्यामुळे हा पूर्वनियोजित कट नाही का? असा सवालही घरत यांनी विचारला. तसेच सर्व मारहाण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचंही घरत यांनी सांगितले. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते जो पुण्याचा (Pune) आहे,
त्याच्या संपर्कात नितेश राणे आहेत. परब यांचा फोटो सातपुतेने राणेंना पाठवल्याने हा सर्वात मोठा पुरावा असल्याने मग हा सुपारी घेऊन केलेला गुन्हा नाही का? असा सवाल घरत यांनी उपस्थित केला. सचिन सातपुते आणि त्यांचे सहकारी हे सुपारी घेणारे आहेत पण कोणी तरी सुपारी दिली, तो सुपारीबाज म्हणावाच लागेल ना? असं म्हणत घरत यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता युक्तीवाद केला.
नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तीवाद
संतोष परब यांना चाकूने नाही तर पेपर कटरने झाली आहे असे हायकोर्टाने म्हटले आहे.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि त्यावेळीच्या मारहाणीचा प्रकार न्यायालयाला सांगत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कस्टडीमध्ये 48 तास चौकशी झाली.
पोलीस कोठडीच्या पूर्वी देखील नितेश राणे यांनी तपासात सहकार्य केले आहे, असा युक्तीवाद मान शिंदे यांनी केला.
Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 6107 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
ELSS Funds | ‘हे’ 10 ELSS फंड देत आहेत धमाकेदार रिटर्न, प्रॉफिटसह टॅक्ससुद्धा वाचवा