पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पंतप्रधान आवास योजनेतील (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळवून देतो, असे सांगून पाच जणांची फसवणूक करणार्या दोघांना निगडी पोलिसांनी (Nigdi Police) अटक (Pune Crime) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे),
योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. घुलेनगर, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी रवींद्र बबन शिंदे (वय ३१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे.
शिंदे व इतर संतोष चव्हाण, गोरक्षनाथ गवंड, प्रविण गावडे, बबन लोंबाटे यांना या दोघांनी चिखलीमधील (chikhli) घरकुल (Gharkul) येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (pradhan mantri awas yojana) व्हीआयपी कोठ्यातून घर व गाळा मिळून देतो.
असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून त्यासाठी वेळोवेळी ७ लाख ६२ हजार रुपये घेतले.
मात्र, त्यांना घर व गाळा मिळवून दिला नाही.
तसेच त्यासाठी घेतलेले पैसे परत केले नाही.
फिर्यादी व इतरांनी अनेकदा पैशांची मागणी केल्यानंतरही ते न दिल्याने शेवटी त्यांनी
पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ
(Assistant Police Inspector Vijaykumar Dhumal) अधिक तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | PM arrested for cheating under the guise of getting a house from a VIP room in the housing scheme
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
Pune Crime | ‘ड्राय डे’च्या दिवशी चाकूचा धाक दाखवून टोळक्याने लुटल्या दारुच्या बाटल्या