पुणे / पौड :बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | गाय आमच्या शेतात का बांधली या कारणावरून आज शनिवारी (दि. 28) रोजी सकाळी सख्ख्या चुलत भावात तुंबळ हाणामारी (Fighting) झाली आहे. या हाणामारीत एका भावाला, त्याच्या वडिलाला, आई, बायको, मुलगा यांना जबर मारहाण करण्यात आली होती. दुर्देवी बाब म्हणजे या झालेल्या हाणामारीत आईचा प्राण (Death) गेल्याचं समोर आलं आहे. ही घटना मुळशी (Mulashi) तालुक्यातील घोटावडे येथे असलेल्या लांडगेवाडी येथे घडली आहे. महादेव लांडगे (वय, 33) आणि त्यांचे वडील गुलाब लांडगे, आई मुक्ताबाई लांडगे (मृत), बायको सुरेखा लांडगे, मुलगा वैभव लांडगे यांना मारहाण (Pune Crime) केली गेली.
याबाबत अधिक माहिती अशी, घोटावडे येथे महादेव लांडगे (Mahadev Landage) यांचे सख्खे चुलत भाऊ दत्ता लांडगे, प्रविण लांडगे आणि त्यांची आई सुमन लांडगे यांनी महादेव लांडगे यांना गाय आमच्या शेतात का बांधली याबाबत विचारणा केली. यातच वाद निर्माण झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत उतरले. यामध्ये दत्ता लांडगे, प्रविण लांडगे व सुमन लांडगे यांनी महादेव लांडगे, मुक्ताबाई लांडगे यांना काठ्या, कुह्राड आणि कोयत्याने घरातील 5 जणांना जबर मारहाण केली.
या झालेल्या हाणामारीत महादेव याची आई मुक्ताबाई यांचा मृत्यू (Death) झाला, तर, महादेवला पुण्यातील खासगी रूग्णालयात (Private hospital) उपचारासाठी हलवलं.
तसेच अन्य तिघांनाही मारहाण झालीय.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, याप्रकरणी माहिती समजताच पौडचे पीआय अशोक धुमाळ (Paud’s PI Ashok Dhumal), एपीआय विनायक देवकर (API Vinayak Deokar), शिवसेना समन्वयक प्रकाश भेगडे,
काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, भाजपाचे रामचंद्र देवकर, पोलिस पाटील दिपक मातेरे,
भेगडेवाडीचे पोलिस पाटील सुनिल माकर, पोलिस हवालदार अनिता रवळे, सुधीर होळकर,
राँकी देवकाते यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Web Title : Pune crime | Number of cousins from cows tied in the field; Mother’s death.
Pune News | मतदार कमी असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवडणूका घेण्याचा निर्णय – अजित पवार