पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणाकरून त्यांच्याच खात्यातून तब्बल 5 लाख 8 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (wanwadi police station) काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News | Fraud of Rs 5 lakh to a senior citizen under the pretext of withdrawing money from an ATM center
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 25 जानेवारी या दिवशी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी एटीएममधून पैसे निघत नसल्याने एटीएम (ATM) मशीन जवळ असणाऱ्या एका व्यक्तीने ‘बाबा तुमचे पैसे निघत नाहीत का ? मी मदत करू का ?” अशी विचारणा केली.
त्यांनीही पैसे काढून देण्यास विनंती केली. त्यादरम्यान हात चलाखीकरत फिर्यादीच एसबीआयचे एटीएम कार्ड काढून घेतले.
आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 25 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या काळात वेळोवेळी एकूण 5 लाख 8 हजार 115 रुपये काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली.
त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेराची पडताळणी करत तपास सुरू केला आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.
Web Title : Pune Crime News | Fraud of Rs 5 lakh to a senior citizen under the pretext of withdrawing money from an ATM center
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु