पुणे न्यूज : Pune News : बहुजननामा ऑनलाईन – खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या पत्रकार देवेंद्र जैनला (journalist Devendra Jain) पुणे शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी दिली आहे. यापुर्वी पुणे शहर पोलिसांनी आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे (rti activist ravindra barate) याला अटक केली होती. पत्रकार देवेंद्र जैनला अटक केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. (pune news | pune police arrest journalist devendra jain)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पत्रकार देवेंद्र जैन हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्याविरूध्द शहरातील काही पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हयांची नोंद आहे. रवींद्र बर्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार, सांगलीचे संजय भोकरे आणि इतरांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) यापुर्वी रवींद्र बर्हाटेच्या (rti activist ravindra barate) पत्नी आणि मुलाला देखील अटक केली होती. गुन्हे शाखेचे पोलिस रवींद्र बर्हाटेच्या युध्दपातळीवर मागावर होते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रवींद्र बर्हाटेला अटक केली. त्यानंतर आज पुणे पोलिसांनी देवेंद्र जैन याला अटक केली आहे. त्याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीसनामा ऑनलाइनला माहिती दिली आहे. देवेंद्र जैन याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत सखोल तपास केला जाणार आहे. गुन्हयाचा पुढील तपास पुणे पोलिस (Pune Police) करीत आहेत.
Web Title : pune news pune police arrest journalist devendra jain
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime News | एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 5 लाखाची फसवणूक
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु