Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्या उमेदवाराला अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police Force) भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करुन फसवणुक (Cheating Case) करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सचिन भिमराव वाघमोडे Sachin Bhimrao Waghmode (रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर – Solapur) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील (Sub-Inspector of Police Vinayak Dadaspatil) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४७/२३) दिली आहे. हा प्रकार ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक कार्यालयात ८ मे २०२३ पासून आजपर्यंत घडला.
ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी सचिन वाघमोडे याने आरक्षित जागेवर अर्ज केला होता.
त्यासाठी त्याने बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई – PTE) प्रमाणपत्र सादर केले होते.
पोलिसांनी त्याची संबंधित संस्थेकडे पडताळणी केली असता ते प्रमाणपत्र खोटे व बोगस असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांकडून फिर्याद देण्यात आली आहे.
Web Title : Pune Crime News | Chaturshringi Police Station – Candidate who gave fake certificate for police recruitment arrested
हे देखील वाचा :
Aaditya Thackeray On Vetal Tekdi Pune | आदित्य ठाकरे रविवारी सकाळी वेताळ टेकडीवर ट्रेकींग करणार
Comments are closed.