Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल

 Pune News | An amateur bullock cart owner brought a mare from an expensive Fortuner car; Video storm viral

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune News | ‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हणतात ते काही उगाचच नाही. पुणे जिल्ह्यातील एका पट्ठ्याने चक्क एका लहान घोडीला फॉर्च्युनर कारमधून (Fortuner Car) आणले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. शिरुर (Shirur) तालुक्यातील ढोक सांगवी (Dhok Sangvi) गावतील किरण दगडू पाचंगे (Kiran Dagdu Panchange) या हौशी बैलगाडा मालकाने अहमदनगरमधून (Ahmednagar) 5 महिने वयाची घोडी 25 हजार रुपयांना विकत घेतली आणि तिला घरी आणताना तिला चक्क आपल्या महागड्या फॉर्च्युनर कारमध्ये आणले. (Pune News)

 

बैलगाडा शर्यतीला आता सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) हिरवा कंदील दिल्याने बैलगाडा मालकांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून ते पुन्हा जोमाने तयारीला लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune District) उत्तर भागात बैलगाडा शर्यतींचं खूप लोण असून तिथे मोठ्या प्रमाणात शर्यतीचे आयोजन केले जाते. चार बैल जुंपून खेळली जाणारी या उत्तर भागातील बैलगाडा शैर्यतीचे (Bullock Cart Race ) अनेक चाहते आहेत. बैलगाड्याला जुंपलेले 2 धुरेकरी बैल तर त्यांच्या पुढे पळणारे २ चाव-हेकरी बैल चित्तधरारक खेळ खेळतात. पण या बैलांआधी त्यांना दिशा देण्याचे काम करते ती घोडी. ही घोडी (Mare) हुशार व चपळ लागते. त्यामुळे येथे घोडीला ही बैलांएवढाच मान आणि किंमत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

त्यामुळेच या तरुणाने ही घोडी घेतली असून तिला महागड्या फॉर्च्युनरमधून आणले.
मोठी तयार घोडी देखील मिळते पण तिचा शर्यतीमध्ये काही भरवसा नसल्याने लहान घोडीचं शिंगरू घेतलं जातं.
त्याला लहानपणापासून प्रशिक्षण देऊन दंदुरस्त व चपळ केली जाते. व शर्यतीत उतरवली जाते.
घाटात पळणाऱ्या बैलांना जशी लाखांची किंमत मिळते, तशीच घोडीला सुद्धा लाखो रुपयांची किंमत मिळते. (Pune News)

 

 

Web Title :  Pune News | An amateur bullock cart owner brought a mare from an expensive Fortuner car; Video storm viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍या उमेदवाराला अटक

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप