पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोयते घेऊन परिसरात दहशत माजवत असताना भिती पोटी दुकान बंद करणाऱ्यास शिवीगाळ करत दाब देऊन गल्यातील रोकड पळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला. दोन सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवत तुफान राडा घटल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.
याप्रकरणी निलेश उर्फ पिन्या संजय साळवे आणि निखील उर्फ पप्या साळवे (रा. दोघेही यशवंतनगर येरवडा) या दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रमाराम अदाराम चौधरी (वय ४६) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संध्याकाळी साडे सातच्या सुमारास प्रमाराम त्यांच्या दुकानात होते.
त्यावेळी नीलेश व निखीलने हातात कोयते घेऊन परिसरात शिवीगाळ करुन आरडा-ओरडा करत दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरात चांगलीच धावपळ सुरू झाली होती. यावेळी काही दुकानदार दुकाने बंद करत होते. फिर्यादी यांनी देखील भितीपोटी दुकान बंद करण्यास सुरुवात केली असता कोयत्याचा धाक दाखवून पैशाची मागणी करत जबरदस्तीने गल्यातील अडीच हजारांची रोकड चोरी करून पळ काढला. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.