Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 5 लाखांचा गंडा, 3 जणांविरुद्ध FIR; विमानतळ परिसरातील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | 21 lakhs to the company by deactivating the SIM card of the company; Type in Chinchwad MIDC
January 23, 2023

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आभासी चलनात गुंतवणूक (Investment in Virtual Currency) करण्यास सांगून एका व्यक्तीची पाच लाख 21 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime News) आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी मरिना शर्मा (Marina Sharma), अमदी यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य हरिगोविंद पांडे Aditya Harigovind Pandey (वय 38, रा. गुडविल निर्मिती को-ऑप सोसायटी, पोरवाल रस्ता, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शर्मा आणि त्याच्या इतर साथीदारांनी पांडे यांनी लिओप्रडेबिट डॉट कॉम
(Leopredebit.com) संकेतस्थळाच्या माध्यमातून आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल,
असे आमिष दाखविले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून गुंतवणुकीच्या आमिषाने वेळोवेळी 5 लाख 21 हजार रुपये
घेतले. पैसे घेतल्यानंतर आरीपींनी पांडे यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात
आल्यानंतर पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक लहाने (API Lahane) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 5 lakh extortion on the lure of good returns, FIR against 3; Incidents around the airport

 

हे देखील वाचा :

Mouni Roy | मौनी रॉयच्या हॉट फोटोजची सोशल मीडियावर एकच चर्चा; फोटो पाहून चाहते घायाळ

Lifestyle | आपण रोखू शकत नाही वाढते वय, परंतु टाळू शकतो, एक्सपर्टकडून जाणून घ्या काय खाल्ल्याने त्वचा राहील तरूण

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गटात इनकमिंग सुरूच; सईद खान यांनी दिला इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश