पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे स्टेशन(Pune station) परिसरात ही घटना घडली आहे. खून कोणी केला हे अद्याप समजू शकलेले नाही.
संजय बाबू कदम (वय 35, रा. घाटकोपर Ghatkopar) असे खून(murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्या(Bundgarden Police Thane)त गुन्हा(FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष कांजळे(Sub-Inspector Santosh Kanjale) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे शिरूर(Shirur)मधील आंबेगाव(Ambegaon) येथे एका हॉटेला(hotel)त काम करत होते. मूळचे घाटकोपर येथील परेरावाडी(Pererawadi) येथील आहेत. दोन दिवसांपूर्वी (सोमवारी) रात्री घाटकोपर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात आले होते. ते साधू वासवणी चौका(Sadhu Vaswani Chowk)तून आलंकार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजय सेल्स(Vijay sales) समोरील बस स्टॉप(Bus stop)वर झोपले होते. यादरम्यान मध्यरात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने डोळ्यांच्या वर आणि डोक्यात मारहाण करून त्यांचा खून(murder) केला.
मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान खुन चोरी(robbery)च्या उद्देशाने झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप तरी या खुनाचा छडा लागलेला नाही.
दरम्यान पुणे स्टेशन परिसर आणि ससून परिसरा(Pune station area and Sassoon area)त सतत चोरीच्या आणि मारहाणकरून लुटण्याच्या घटना घडत आहेत. मध्यरात्री या परिसरात गर्दुले, दारुडे व चोरट्याचा राबता असतो. त्यामुळे पोलिसांची पेट्रोलिंग आणि गस्त नेमकी असते कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेर गावाला जाण्यासाठी आलेले व्यक्ती आणि बाहेरून पुण्यात आलेले बहुसंख्य प्रवासी या परिसरात उतरतात. पण, त्यांच्या सुरक्षा राम भरोसेच अशी म्हणायची वेळ आली आहे.
web title: Pune Crime | Murder with intent to steal a passenger sleeping at a bus stop on his way to Mumbai; Incidents in Pune station area, huge excitement.