पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | खंडणी(Ransom) न दिल्यावरून डुक्कर खिंड(Dukkar Khind area) भागात बांधकाम व्यावसायिका(Builder)वर गोळीबार(Firing) करणाऱ्या चौघांच्या टोळीवर मोक्का(Mocca)नुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा Maharashtra Organized Crime Control Act) कारवाई करण्यात आली आहे.
अभिजित ऊर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय 24, रा. कर्वेनगर Karvenagar) व उमेश श्रीराम चिकणे (वय 28,रा. कोथरूड Kothrud) यांना अटक केली आहे. तर, नकुल शाम खाडे (मूळ रा. जुनी सांगवी(Old Sangvi), सध्या कोथरूड) व चेतन चंद्रकांत पवार एसएनडीटी(SNDT)जवळ हे दोघे अद्यापही फरार(Absconding) आहेत. या चौघांवर मोक्का कारवाई केली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्या(Warje Malwadi Police Thane)त गुन्हा दाखल आहे.
नकुल खाडे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो या टोळीचा प्रमुख आहे. त्याने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक फायदा मिळवा या उद्देशाने गुन्ह्यातील साथीदार आरोपी व अन्य सदस्यांना बरोबर घेवून संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केलेली आहे. त्यांनी आजवर खून, खुना(MURDER)चा प्रयत्न, खंडणी यासह विविध गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान डुक्कर खिंडीजवळ दोन दुचाकीवरून येवून पिस्टलमधून पाच गोळीबार केला होता. त्यापूर्वी एक महिना अगोदर टोळी प्रमुख नकुल खाडे यांनी फिर्यादी रवींद्र तागुंदे(Plaintiff Ravindra Tagunde) यांना पाच लाख रुपये खंडणी मागितली होती. मात्र, तागुंदे यांनी खंडणी न दिल्याने खाडे याने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर गोळीबार करून चांदणी चौकाचे दिशेने पळ काढला होता.
यापार्श्वभूमीवर वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके(Senior Inspector Shankar Khatke of Warje Police Station) यांनी उपयुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्याची पडताळणी करून हा प्रस्ताव अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे(Upper Commissioner Dr. Sanjay Shinde) यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्का(Mcoca)ची कारवाई केली आहे.
web title: Pune Crime | Mcoca on four criminal by pune police.