पुणे : बहुजननामा ऑनलाईन – नवऱ्याच्या डोक्यात बॅटने मारहाण करुन गळा आवळून खून करुन पतीचा मृतदेह गळफासाला लटकवून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचा प्रकार पुण्यात (Crime in Pune) उघडकीस आला आहे. पतीचा खून (Husband murder) केल्यानंतर पत्नी दोन दिवस बाहेरगावी निघून गेली. परंतु अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीने केलेल्या वाच्चतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस (Crime in Pune)आला. आईने बाबाला मारल्याची माहिती मुलीने नातेवाईकांना दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी (khadak police station) पत्नीला ताब्यात घेतले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दिपक बलवीर सोनार Deepak Balveer Sonar (वय-36 रा. गुरुवार पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.12) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी राधिका दिपक सोनार Radhika Deepak Sonar (वय-34 रा. गुरुवार पेठ) ताब्यात घेतले आहे. दिपक सोनार हे रखवालदाराचे काम करत होते. ते गुरुवार पेठेतील एका वाड्यात वास्तव्यास होते.
राधिका सोनार ही एका कपड्याच्या दुकानात कामाला होती. दिपकला दारुचे व्यसन होते. पत्नी घरी आल्यानंतर तिच्यावर संशय घेत होता. यावरुन त्यांच्यात सतत वाद होत होते. सोमवारी रात्री राधिका कामावरुन आल्यानंतर याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी संतापलेल्या राधिकाने दिपकला बॅटने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दिपकचा मृतदेह बाथरुममध्ये नेऊन दोरीने लटकवला. त्यानंत ती दोन दिवस घराबाहेर निघून गेली. परत आल्यावर तिने पतीने गळफास घेतल्याचा बनाव करुन याची माहिती नातेवाईकांना दिली. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
दरम्यान, दीपकच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीने तिच्या आईने बाबांना मारल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे राधिकाचे कृत्य सर्वांसमोर आले. त्यानंतर नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी राधिकाला ताब्यात घेतले. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.
Web Title : pune crime husband stabbed in the head with a stick and strangled
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | पुण्यात बँक मॅनेजरच्या मदतीने घातला बँकेलाच गंडा
Corona News | कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? WHO चे प्रमुख म्हणाले…