पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन- Pimpri Crime |पिंपरीतील विठ्ठलनगर परिसरात (Vitthalnagar Area) राहणार्या १२ वर्षाच्या ८ वीत शिकणार्या मुलाने अण्णासाहेब मगर स्टेडियम (Annasaheb Magar Stadium) येथील झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास (Galfas ) घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सुशांत तानाजी सरवदे Sushant Tanaji Sarvade (वय १२, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या मुलाचे नाव आहे. सुशांत याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
बाहेर जातो, असे सांगून गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील (Annasaheb Magar Stadium) एका झाडाला त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना त्याच्या मित्राने घरी जाऊन आईला सांगितली. नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला रुग्णालयात (Hospital) नेले. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यु (Death) झाला होता.
सुशांत हा मामाच्या गावी उस्मानाबाद (Osmanabad) येथे शिकण्यासाठी होता. नुकताच तो आठवीमध्ये गेला होता. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात ऑनलाईन शाळा (Online School)असल्याने तो आपल्या आईवडिलांकडे डिसेंबरमध्ये पिंपरीत आला होता. त्याच्या मागे आईवडिल, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
सुशांत हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याने आत्महत्या करावी यासारखे काही कारण घरात घडलेले नव्हते. त्यामुळे सुशांत आत्महत्या (Suicide) करु शकत नाही.
त्याचा कोणीतरी घातपात केला असावा, अशी शक्यता सुशांतच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी पोलीस (Pimpri Police) अधिक तपास करीत आहेत.
web title: Pimpri Crime | 12-year-old boy commits suicide at Annasaheb Magar Stadium.
Pune Crime | पुण्यात पतीचा खून करुन फासावर लटकवले; अंत्यसंस्काराच्यावेळी मुलीनं सर्व काही सांगितलं
Pune Crime | पुण्यात बँक मॅनेजरच्या मदतीने घातला बँकेलाच गंडा