पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेल मालकाच्या मुलीला पळवून नेणार्या दोघांना लाकडी काठी, लोखंडी रॉडने मारहाण करुन दोघांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील खेड तालुक्यात समोर आला आहे. बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय गावडे (वय 28, दोघे रा. आसखेड खुुर्द, ता. खेड) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले (Pune Crime) आहे.
हॉटेल मालक बाळू मरगज, अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्राकरा ऊर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव (रा. करंजविहीरे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. ही घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे घडली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाऱ बाळू मरगज यांचे खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे हॉटेल ‘माणुसकी’ हे हॉटेल आहे. त्या हॉटेलसमोरच त्यांची वीट भट्टी आहे. या वीटभट्टीवर बाळू सिताराम गावडे हा काम करत होता. त्याचे व हॉटेल मालक यांच्या 21 वर्षाच्या मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच राहुल गावडे याच्या मदतीने ते दोघे 14 जुलै रोजी पळून गेले. ही बाब हॉटेल मालक बाळू मरगज यांना समजल्यावर त्यांनी दोघांचा शोध सुरु केला.
दोन दिवसांच्या शोधानंतर गुरुवारी तिघांचा शोध लागला. त्यांना पुन्हा गावात आणण्यात आले.
त्यांना लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. त्यात दोघांचा मृत्यु झाला.
मुलीलाही मारहाण करण्यात आली असून ती जखमी झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी (Chakan Police) घटनास्थळी धाव घेऊन 6 जणांना ताब्यात घेतले आहे.
web title: Pune Crime | Honor killing in Pune district! Two kidnappers killed by owner of Hotel ‘Manusaki’; 6 people in police custody.
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’