नवी दिल्ली : वृत्त संस्था – Social Media News | मोदी सरकार(Modi government) फेक अकाऊंट्स(Fake accounts)वर नवीन IT नियमानुसार लगाम लावत असल्याचा दावा करत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, Facebook, Twitter, Instagram सारख्या सोशल मीडिया ( Social Media) कंपन्यांनी फेक अकाऊंट्स (Fake Accounts) केवळ 24 तासांच्या आत डिलिट करावीत. जर कुणी व्यक्ती एखादा सेलिबे्रटी, बिझनेसमॅन, नेता, खेळाडू इत्यादींचे फेक प्रोफाइल बनवून त्यामध्ये त्यांचा फोटो आणि व्हिडिओ शेयर करून आपले फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे अकाऊंट 24 तासांच्या आत हटवले जाईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इतकेच नव्हे जर एखाद्या अभिनेत्याच्या नावाने चालवल्या जात असलेल्या फेक अकाऊंटबाबत तक्रार करण्यात आली तर कंपनीला ते फेक अकाऊंट (Fake Accounts) ताबडतोब डिलिट करावे लागेल. इंस्टाग्राम(instagram)वर सर्वात जास्त सेलिब्रेटींचे फॅनपेज(Celebrity fanpages) तयार केल्याचे दिसून येत आहे.
या फॅन पेजवर अनेक लाख फॉलोवर्स(Followers) असतात. जर एखाद्या सेलिब्रिटीने किंवा खेळाडूने आपल्या फॅन पेजबाबत सोशल मीडिया ( Social Media) फर्मकडे तक्रार केली तर कंपनीला ताबडतोब अॅक्शन घ्यावी लागेल आणि ते पेज 24 तासांच्या आत डिलिट करावे लागेल. जर कुणी यूजर दुसर्याच्या नावाने फेक अकाऊंट बनवून आपले फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर आता धोक्याची घंटा आहे. जर यापासून वाचायचे असेल तर अशा चुका टाळाव्या लागतील.
राजकीय पक्षांच्या आयटीसेलने सोशल मीडियावर (Social Media) लाखो अकाऊंट तयार केली आहेत.
Web Title : social media companies shut fake accounts within 24 hours
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Shripad Chindam | शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदम विरुद्ध आता जातीवाचक शिवीगाळ केल्याचा FIR