पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | स्वारगेट बसस्टॅन्ड (Swargate Bus Stand) लगतच्या पुलाखाली येणार्या जाणार्या पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेने (Pune police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संतोष शरणप्पा जाधव Santosh Sharanappa Jadhav (वय ३८), अमित नाना चव्हाण Amit Nana Chavan (वय २७), विनोद बजरंग गायकवाड Vinod Bajrang Gaikwad (वय ३४, सर्व रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार सचिन अशोक गायकवाड (Sachin Ashok Gaikwad) व विकी कृष्णा मानेक (Vicky Krishna Manek) हे पळून गेले असून हे सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहेत. (Pune Crime)
याबाबत पोलीस हवालदार विनोद चव्हाण (Police Constable Vinod Chavan) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट बसस्टॅन्डलगतच्या पुलाखाली बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हे सर्व जण जमले होते.
पुलाखाली येणारे जाणारे पादचारी लोकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याच्या तयारीत ते होते.
याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना पकडले.
त्यांच्याकडून मिरची पावडरची पुडी, दोन कटर, कोयता व दोन बॅगा, ३ मोबाईल असा ३० हजार रुपयांचा माल जप्त
केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (Assistant Police Inspector Mohite) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Gang ready to rob pedestrians jailed; Incidents in Swargate area
हे देखील वाचा :
MLA Bhaskar Jadhav | शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात FIR
Pune Crime | चायनीज न मिळाल्याने टोळक्याची तरुणावर कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न