पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात एक खळबजनक घटना (Pune Crime) घडली असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बाणेर मध्ये ACP ने 44 वर्षीय पत्नी आणि 35 वर्षीय पुतण्याची हत्या (Murder) करुन स्वतःला संपवले आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस (Amravati Police) दलात कार्यरत असलेल्या या ACP ने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या (Suicide) केली. याबाबत माहिती कळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
पत्नी मोनी भारत गायकवाड Moni Bharat Gaikwad (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड Deepak Gaikwad (वय 35) अशी गोळी झाडून खून (Pune Crime) झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ACP भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून कार्यरत होते.
त्यांचे कुटुंबीय पुण्यात बाणेर बालेवाडी परिसरात वास्तव्याला होते.
हत्येनंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून चतु:शृंगी पोलीस (Chathushringi Police Station)
घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
Web Title : Pune Crime | excitement in pune 57 year old acp shot dead 44 year old wife and 35 year old nephew committed-suicide
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुणे: टी शर्ट ट्रायल करत असताना तरुणीचा विनयभंग, कॅम्पमधील दुकानातील घटना
- ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे
- Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक