Pune Crime News | पुणे: टी शर्ट ट्रायल करत असताना तरुणीचा विनयभंग, कॅम्पमधील दुकानातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणी टी शर्ट खरेदी करुन त्याची ट्रायल घेत असताना दुकानातील तरुणाने तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनास लज्जा (Molestation Case) उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी मुकुंदनगर (Mukund Nagar) येथील एका २० वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कैफ कलीममुल्ला शेख Kaif Kalimullah Shaikh (वय २४, रा. जुना बाजार, खडकी – Juna Bazaar Khadki) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महात्मा गांधी रोडवरील (MG Road Pune) नाज चौकाजवळील अशोक विजय कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी दुपारी १ वाजता घडला.
Pune Crime News
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही आरोपीच्या दुकानात टी शर्ट खरेदी करण्यासाठी गेली होती. तिने एक टी शर्ट खरेदी केला. अंगात असलेल्या क्रॉप टी शर्टवर ती नवीन टी शर्ट ट्रायल करत होती. त्यावेळी दुकानातील कैफ शेख याने क्रॉप टी शर्ट वर येईल या बहाण्याने या तरुणीचा जवळ गेला. टी शर्ट धरण्याचा बहाणा करुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे (PSI Mokate) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | girl molested while doing t shirt trial incident in camp shop
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | अख्खे एनडीए उडवून टाकेन; धमकी देणार्यास उत्तमनगर पोलिसांनी केले अटक
- ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर
अॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे - Chandrakant Patil On Pune Police | सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे पोलिसांचे कौतुक
Comments are closed.