पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime Branch Police |लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikanda Police Station) हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी (Pune Crime Branch Unit -6) सापळा रचून अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 6 च्या (Pune Crime Branch Unit -6) पथकाने अटक केलेल्या आरोपींमध्ये मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. ही कारवाई लोणीकंद ते बकोरी रोडवरील खंडोबा मंदिराजवळ रविवारी (दि.4) करण्यात आली.
याप्रकरणी दत्ता रंगनाथ गायकवाड Datta Ranganath Gaikwad (वय 23), गौरव अर्जुन परजणे Gaurav Arjun Parjane (वय 20), किशोर विश्वनाथ जाधव Kishore Vishwanath Jadhav (वय 22) , दत्ता बबन व्यवहारे Datta Baban vyavahare (वय 37, सर्व रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय माकर (वय 25, रा. न्हावरा, शिरूर) फरार झाला आहे. पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामधील दत्ता व्यवहारे हा मनसे सहकार सेना उपाध्यक्ष पुणे जिल्हा पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई ऋषिकेश व्यवहारे व पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की लोणीकंद ते बकोरी रस्त्यावर खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबले आहे. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेऊन चारजणांना ताब्यात घेतले.
–
पोलिसांनी आरोपींकडून गावठी कट्टा, सुरी, मिरचीपुड, लोखंडी कोयता, दोन दुचाकी, नायलॉन दोरी, मोबाईल असा दरोडा टाकण्यासाठी लागणारा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत 1 लाख 15 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी दत्ता रंगनाथ गायकवाड याच्यावर चंदन नगर पोलीस ठाण्यात तर किशोर विश्वनाथ जाधव याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अधिक पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Pune City Police Commissioner Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Police Commissioner Dr. Ravindra Shiswe), अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे (Additional Commissioner of Police Crime Ashok Morale),
पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner of Police Crime Branch Srinivas Ghadge) ,
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मण बोराटे (Assistant Commissioner of Police Crime Branch Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने,
सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुंडे, सचिन पवार,
ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
web title: Pune Crime Branch Police | The gang, which was preparing for the robbery along with MNS office bearers, went missing.
Gadchiroli Police News । गडचिरोलीत पोलीस हवालदाराचा धारदार शस्त्राने खून; प्रचंड खळबळ
lohegaon forest park road |लोहगाव परिसरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अडवून चाकूने सपासप वार, प्रचंड खळबळ