पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लॉजमध्ये दोन गटातील वाद मिटविल्याच्या रागातून टोळक्याने व्यवस्थापकार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना (Pune Crime) 15 ऑक्टोबरला हडपसरमधील भेकराईनगर परिसरात घडली.
याप्रकरणी अक्षय अरूण गोरे Akshay Arun Gore (रा. गंगानगर, हडपसर) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. प्रकाश पनिका Prakash Panika (वय -29) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रकाश हे विजय ओयो लॉजचे (Oyo Lodge) व्यवस्थापक असून दोन दिवसांपुर्वी अक्षय व त्याचे दोन मित्र तेथे आरामासाठी आले होते.
त्यांच्या रूमशेजारी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्याचा त्रास होऊ लागल्यावरून तिघांनी ग्राहकासोबत वादवादी करीत त्याला मारहाण केली.
त्यावेळी प्रकाशने भांडणात मध्यस्थी केली होती. त्याचा राग आल्यामुळे दुसऱ्या दिवशी अक्षयने त्याच्या साथीदारांसह प्रकाश यांना शिवीगाळ केली.
दोघांवरही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. हवेत कोयते फिरवून दहशत माजवित अक्षयने मी फुरंसूंगीचा भाई आहे.
बाहेरून येऊन माझ्यावर हात टाकता का. तुझी विकेटच काढतो असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Saurabh Mane) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Attempted attack on lodge manager saying ‘I am Fursungi’s brother’
हे देखील वाचा :
Pune Crime | 20 कोटीच्या खंडणी प्रकरणात कुख्यात गुंड गज्या मारणे ‘गोत्यात’, 12 दिवसांची पोलीस कोठडी