मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे दिवंगत आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latke) यांच्या रिक्त झालेल्या जागेवर होणारी पोटनिवडणूक (Andheri East By-Election) बिनविरोध करावी, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र पाठविले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले होते. अखेर भाजपने (BJP) आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे ठरविले आहे. त्यावर पुन्हा एकदा पत्र लिहून राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपचे आभार मानले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Uddhav Balasaheb Thackeray) दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे संयुक्त उमेदवार म्हणून मुरजी पटेल (Murji Patel) यांना रिंगणात उतरविले होते. या निवडणुकीवर आणि ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यावर मोठे सत्तानाट्य गेल्या आठवड्यात रंगले होते.
अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल @Dev_Fadnavis आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा ! pic.twitter.com/VKmmJl3Gno
— Raj Thackeray (@RajThackeray) October 17, 2022
राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एक विंनती पत्र लिहिले होते. तसेच शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सर्वच पक्षांना केले होते. त्यावर अखेर भाजपने निर्णय घेत माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूरात याची घोषणा केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपच्या या ऐतिहासिक माघारीवर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पत्रातून भाजपचे आभार मानले आहेत.
माझ्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला,
त्याबद्दल मी आपले आणि पक्षातील नेतेमंडळींचे आभार मानतो.
सकारात्मक राजकीय संस्कृती ही सदृढ समाजासाठी आवश्यक असते.
ही संस्कृती वाढावी यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कायम काम करत असतो.
त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्द्ल तुमचे पुन:श्र्च आभार, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns raj thackeary letter to bjp devendra fadnavis after withdrawing muraji patel nomination from andheri by poll rutuja latke
हे देखील वाचा :
Pune Crime | पुर्ववैमनस्यातून तरुणाचे शीर धडावेगळे करणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक