पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन मुलीने (Minor Girl) युट्युबवर व्हिडिओ (YouTube Video) पाहून स्वत:च घरी प्रसूती (Childbirth) केल्याची धक्कादायक घटना उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात घडली आहे. त्यानंतर तिने नवजात बालकास इमारतीच्या पार्किंगमध्ये झाडाजवळ बेवारस अवस्थेत सोडून दिले. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) गांभीर्याने दखल घेतली असून संबंधिताविरूद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश (Pune Crime) दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोंढवे धावडे परिसरात उत्तमनगर पोलीसांना (Uttamnagar Police) रविवारी रात्री नवजात अर्भक बेवारस स्थितीत मिळून आले होते. त्यानुसार तपास करण्यात येत होता. दरम्यान, काही दिवसांपुर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तिला गर्भवती (Pregnant) असल्याची शक्यता लक्षात घेऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुलीसह पालकांनी डॉक्टरांच्या सल्याकडे दुर्लक्ष करुन मुलीला घरी आणले. घराशेजारील लोकांपासून ही बाब त्यांनी लपवून ठेवले होती. (Pune Crime)
अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कोणाला कळू नये यासाठी मुलीसह तिच्या पालकांनी युट्युबवर व्हिडिओ पाहून तिची प्रसृती केली. त्यानंतर मुलीच्या आईने नवजात बाळ सोसायटीच्या पार्किंगमध्ये झाडाजवळ सोडून दिले होते. सोसायटी परिसरात कुत्रे भुंकत असल्याने रहिवाशांनी पाहणी केल्यावर त्यांना नवजात अर्भक मिळून आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेउन नवजात बाळास ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल केले. त्यानंतर काही वेळातच मुलाची आई बेशुध्द झाल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी सोसायटीत रुग्णवाहिका आली. त्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे (Uttamnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Senior Police Inspector Sunil Jaitapurkar) तपास करत आहे.
राज्य महिला आयोगाकडून दखल
कोंढवे धावडे (Kondwe Dhanade) परिसरात अल्पवयीन मुलीने स्वत:ची प्रसृती युट्युबवर पाहून केल्याचा प्रकार घडला आहे.
त्यानंतर तिने आणि कुटूंबियाने नवजात बाळ बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar)
यांनी पोलीसांना याप्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Shocking… Minor girl commits self-immolation after watching YouTube video, FIR filed against girl who abandoned baby
हे देखील वाचा :
Pune Crime | ‘मी फुरसुंगीचा भाई’ म्हणत लॉज व्यवस्थापकावर हल्ल्याचा प्रयत्न