पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Accident News | बकोरी-केसनंद रोडवरील (Bakori Kesnand Road Pune) जोगेश्वरी मंदिरासमोर दोन कारची एकमेकांसमोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. (Pune Crime Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मयुर भाऊसो बहिरट (रा. केसनंद, ता. हवेली) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात किरण गावडे, सर्जेराव माने, अजय जाधव आणि योगेश केरदळे हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयुर बहिरट हे कार घेऊन केसनंदकडे जात होते.
दुसर्या वाहनातून चौघेजण पुण्याकडे येत होते. दोन्ही कारची एकमेकांसमोर धडक झाली. त्यामध्ये गंभीर जखमी होवुन मयुरचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Accident News)
Web Title :- Pune Crime Accident News | 2 cars collide head-on on Bakori-Kesanand road, one dead and 4 injured
हे देखील वाचा :
Pune Aam Aadmi Party | नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात चिपको आंदोलन
Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन