पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | माळवडेनागर (किवळे) येथे गाडी जोरात चालवल्यावरून पाच जणांच्या टोळक्याने महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण (abusing and beating women) केल्याची घटना देहूरोड येथे घडली आहे. तसेच त्या महिलेच्या भावलाही लोखंडी पाईपने मारहाण (Pune Crime) केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिलेच्या फिर्यादीनुसार चंदू झोंबाडे (Chandu Jhombade), शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी या मित्राच्या पार्टीत गेल्या होत्या. मद्य प्राशन (Alcohol) केल्याने फिर्यादी महिलेने बाहेर येऊन हॉर्न वाजवत गाडी घेऊन गेल्या. त्यावेळी चंदू झोंबाडे याने त्या महिलेची गाडी अडवून जोरात गाडी का चालवत याबाबत विचारणा केली. त्यावेळी झोंबाडे फिर्यादी आणि फिर्यादीचा भाऊ यांच्यात वादावादी झाली.
भावाने भांडण मिटवून फिर्यादी यांना घरी घेऊन गेले. दरम्यान, चंदूने शार्दूल ठाकूर यांच्यासह इतर
चार ते पाच जणांसोबत फिर्यादी यांच्या घराचा घुसून फिर्यादी यांच्या भावला लोखंडी पाईपने
मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण
केली. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास देहूरोड पोलीस (Dehuroad Police) करीत आहेत.
Web Title :- pune crime abusing and beating women over argument over speeding after friends party incident kiwale
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात
Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट