नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tokyo Olympics | नीरज चोपडा (Neeraj Chopra) ने टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) मध्ये भारताला अॅथलेटिक्सचे पहिले ऑलम्पिक मेडल मिळवून दिले. फायनलमध्ये त्याने 87.58 मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत तो नंबर एकवर राहिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
क्वालिफिकेशनमध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी बनवण्यात आले होते. नीरज ग्रुप ए सोबत ओव्हरऑल टॉपवर होता, तर पाकिस्तानचा अरशद नदीम (Arshad Nadeem) ग्रुप बी मध्ये टॉपवर होता. तो ओव्हरऑल क्वाालिफिकेशनमध्ये तिसर्या नंबरवर होता.
टॉप 5 मध्ये होता अरशद नदीम
पाकिस्तानी खेळाडूने शानदार कामगिरी केली आणि टॉप 5 मध्ये सुद्धा राहिला. खरं तर तो नीरजच्या स्कोअरच्या जवळपास सुद्धा पोहचू शकला नाही. नीरज आणि अरशदमध्ये मैदानात नेहमीच सामना पहायला मिळतो. 2018 एशियन गेम्समध्ये नीजरने गोल्ड तर अरशदने ब्राँझ जिंकले होते.
टोकियोमध्ये सुद्धा पाकिस्तानी खेळाडूने आपल्या करियरची तिसरी सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आणि
84.62 च्या थ्रो सह 5व्या स्थानावर राहिला. सामन्यात एकावेळी तो चौथ्या स्थानावर होता. त्याची
सर्वश्रेष्ठ कामगिरी यावर्षी इमाम रेजा कपमध्ये झाली. त्यादरम्यान त्याने 86.38 मीटरचा थ्रो केला
होता. तर 2019 मध्ये साऊथ एशियन गेम्समध्ये त्याने 86.29 मीटरचा थ्रो केला होता.
Web Title :- tokyo olympics others neeraj chopra arshad nadeem position in tokyo olympics javelin throw final
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Eknath Khadse | आठवडाभरापासून एकनाथ खडसे रुग्णालयात
Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट