पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | उपचारासाठी मनोरुग्णालयात (Mental Hospital) दाखल असताना कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे मनोरुग्ण युवकाचा इमारतीवरुन पडून मृत्यु (Death) झाला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) डॉक्टर (Doctor) व त्यांच्या स्टाफविरोधात गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.
डॉ. अमर शिंदे (Dr. Amar Shinde) व त्यांचे स्टाफ असे जागृती सायक्रॅटिक सेंटर हॉस्पिटल, मांजरी (Jagruti Psychiatric Center Hospital, Manjari) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जागृती सायक्रॅटिक सेंटर हॉस्पिटल येथे १ ऑक्टोबर २०२० रोजी घडला होता. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत काळेपडळ (Kalepadal, Hadapsar) येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १८ वर्षाचा मुलगा आदित्य (Aditya) याला उपचाराकामी जागृती सायक्रॅटिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील स्टाफ निरंजन पंडित (Niranjan Pandit) याने घरी का फोन लावला, असे म्हणून हाताने मारहाण केली. हा मुलगा मनोरुग्ण आहे हे माहिती असतानाही मुलावर लक्ष ठेवले नाही.
तो इमारतीच्या वरती जावून पडून मृत्यु होऊ शकतो, याची जाणीव असतानाही त्याच्यावर कोणी लक्ष ठेवले नाही.
त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मुलगा हॉस्पिटलच्या जिन्याने वरती जाऊन इमारतीवरुन पडून मृत्यु झाला.
मुलाच्या मृत्युस हे कारणीभूत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डगळे (Police Inspector Dagle) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | A case has been registered in the Hadapsar police station against the doctor and the staff in the case of the death of a psychiatric patient
हे देखील वाचा :
Shivsena MP Sanjay Raut | ‘इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही’ – संजय राऊत