राजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाइन– Chasakman Dam | जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा (Pune Rain) जोर कायम आहे. खडकवासलातून (Khadakwasla Dam) विसर्ग सुरू असून आता खेड तालुक्यातील चासकमान धरण (Chasakman Dam) ९० टक्के भरले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यामार्गे ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीला (Bhima River) करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
खेड तालुक्यात कळमोडी (Kalamodi Dam), चासकमान (Chasakman Dam), भामा आसखेड (Bhama Askhed Dam) अशी तीन धरणे आहेत. ११ जुलैला कळमोडी धरण १०० टक्के भरले, तर भामा आसखेड धरण ७८ टक्के भरले आहे. त्यानंतर आता चासकमान धरणही ९० टक्के भरले आहे. गतवर्षी ५ ऑगस्टला चासकमान धरण भरले होते.
चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून भीमाशंकर (Bhimashankar), भोरगिरी (Bhorgiri),
कारकुडी (Karkudi), मंदोशी (Mandoshi), कुडे (Kude) परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
५१७ मिमी पावसाची नोंद झाली असून पाऊस (Pune Rain Update) कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तसेच नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे, नदीतील कृषिपंप काढून घ्यावेत, असे आवाहन चासकमान पाटबंधारे प्रशासनाने (Chasakman Irrigation Administration) केले आहे.
Web Title :- Chasakman Dam | chasakman dam is 90 percent full 4 thousand 295 cusecs discharge in bhima river
हे देखील वाचा :
Pune Crime | मनोरुग्णाच्या मृत्यु प्रकरणी डॉक्टरासह स्टाफवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल