पुणे : बहुजननामा ऑनलाईन – टाटा मोटर्समध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची साडे बारा लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विकास गुप्ता व नरेंद्र तिवारी यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण अप्पा गवस (वय 51) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (sinhagad road police station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नोकरीची गरज होती. त्यामुळे त्यांनी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर बायोडाटा अपलोड केला होता. त्यानुसार त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्यानंतर त्यांना टाटा मोटर्स या कंपनीत सुपरवायझरची नोकरी लावतो असे सांगत त्यांना आमिष दाखवले. तर त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना काही पैसे भरावे लागतील असे सांगत वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्याकडून तबल 12 लाख 59 हजार रुपये उकळले. तरीही त्यांना नोकरी लावली नाही. त्यावेळी त्यानी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस (sinhagad police) करत आहेत.
Web Title : pune crime 12 lakh fraud in the lure of getting a job in tata motors fir against vikas gupta and narendra tiwari
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pimpri News | भाजपच्या विद्यमान नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु