राजस्थान : वृत्तसंस्था – Rajasthan News किल्ल्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले असता त्यावेळी अचानक वीज कोसळून 11 तरुणांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थान Rajasthan News येथील जयपूर (Jaipur) ठिकाणी घडली आहे. काही तरुण किल्ल्यावर सेल्फी काढत होते, तेव्हा अचानक वीज कोसळली आणि त्यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. (A sudden power outage while taking a selfie killed 11 people on the spot)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यंदा सर्वत्र पावसाने जोर धरला आहे. विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस बरसत आहे. अशातच राजस्थानमधील जयपूर येथे काही तरुण तरुणी पावसाचा आनंद लुटण्यासाठी आमेर किल्ल्यावर (Amer Fort) गेले होते. त्यावेळी वॉच टॉवरवर (Watch Tower) काही तरुण सेल्फी काढत होते. त्यावेळी जोरात वीज कोसळली आणि त्यात दुर्देवी 11 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी होऊन दरीत कोसळले आहेत.
दरम्यान, अशा जोरदार पावसाच्या स्थितीत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात प्रयागराज या ठिकाणी वीज कोसळून सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. तेथे वीज कोसळून 2 लहान मुलांसह 13 जण ठार झाले आहेत. तसेच, कानपुरात 2 महिलांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. फिरोजाबाद जिल्ह्यात 3 जण, कोसांबी येथे दोघांचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) येथील ग्वालियर, शिवपुरी, बैतुल, होशंगाबाद, रिवा येथे वीज कोसळून 11 जण ठार झाले आहेत. तर तेरा जण जखमी अवस्थेत आहेत.
Web Title : rajasthan eleven people died lightning strike taking selfie
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | तडीपार गुंड पप्पु वाडेकरच्या खुनाचे कारण स्पष्ट; पुणे ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक
Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु