पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. स्थानिक प्रशासन देखील दिवसरात्र एक करून व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1188 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज 1188 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 67,777 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले आहेत.
एकूण पॉझिटिव्ह 84,496
आज 45 मृत्यू
एकूण मृत्यू 2033#COVID19 #Pune pic.twitter.com/cr6n0vo2Kn— Smart Pune (@SmartPune) August 24, 2020
सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 84496 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 67 हजार 777 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 2033 जणांचा मृत्यू झत्तला आहे.