Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 422 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. काल (शनिवार) शहरात 265 रुग्ण आढळून आले होते. तर आज रुग्णसंख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 225 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 422 रुग्ण बरे झाले आहेत.
आजपर्यंत पुणे शहरात 6 लाख 59 हजार 134 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 47 हजार 621 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 336 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज शहरामध्ये 3 हजार 592 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 177 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 126 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 20 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर (Non-invasive ventilator) 10 रुग्ण आहेत.
Web Title :- Pune Corona Update | 422 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत
Comments are closed.