पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) दैनंदिन रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याचबरोबर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 184 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 88 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 429 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 88 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 206 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 184 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 53 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 1105 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 81 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1 हजार 024 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णांचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | Great relief! The daily number of patients in Pimpri Chinchwad is less than one hundred, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Urad Dal | ‘या’ डाळीचा करा दैनंदिन डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या हृदयरोगापासून वाचण्याची सोपी पद्धत