पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज (बुधवार) वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते. मध्यंतरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 266 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 215 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 008 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 089 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8863 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात 2056 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9604 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 30 लाख 26 हजार 716 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 2056 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 202 रुग्ण गंभीर आहेत.
तर 261 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : Pune Corona | 266 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, knowing other statistics
NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार, 3 जणांवर FIR