पुणे न्यूज :बहुजननामा ऑनलाईन (नितीन पाटील) – Pune Crime | पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच दोन्ही आयुक्तालयाकडून मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गायकवाड (Ganesh and Nanasaheb Gaikwad) बाप-लेकास पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. मोक्का लावल्यानंतर काही तासाच्या आत पोलिसांनी गायकवाड बाप-लेकास अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (Ganesh alias Kedar Nanasaheb Gaikwad) आणि नानासाहेब शंकर गायकवाड Nanasaheb Shankar Gaikwad (दोघे रा. आय.टी.आय. रोड, औंध) अशी अटक केलेल्यांची नाव आहे.
नानासाहेब गायकवाड हे मोठे उद्योजक आहेत तर गणेश गायकवाड हा एका राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी होता. त्याला राजकीय पक्षानं पक्षातून काढून टाकलं आहे.
गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर इतर काही पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) यांनी गायकवाड बाप-लेकासह इतरांविरूध्द मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई केली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर काही तासातच गणेश आणि नानासाहेब गायकवाड यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (assistant commissioner of police bajrang desai) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गायकवाड यांना अटक करण्याचे आदेश यापुर्वीच दिले होते.
गायकवाड बाप-लेकास ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना कायदेशीरबाबी पुर्ण करून पुण्यात आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title : Pune police arrest ganesh gaikwad and nanasaheb gaikwad.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 266 नवीन रुग्ण, जाणून इतर आकडेवारी
NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Pune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार, 3 जणांवर FIR