पुणे :बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पण आज नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 200 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 123 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 97 हजार 612 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 86 हजार 421 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 09 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8965 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात 2226 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 8865 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 32 लाख 12 हजार 128 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2226 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 213 रुग्ण गंभीर आहेत. तर 296 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : Pune Corona | 200 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics.