पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 71 हजार 153 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 123 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 65 हजार 854 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरात 1452 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1452 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 16,326 हजार जणांना लस
गुरुवारी (दि.09) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 16 हजार 326 जणांना लस देण्यात आली असून आजपर्यंत शहारमध्ये 15 लाख 88 हजार 668 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 183 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics.
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 200 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी