बहुजननामा ऑनलाइन – आयुक्तालयातील दोन सहाय्यक पोलिस (Police) आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याबाबतचा आदेश काढला आहे. गुन्हे शाखेत आणि विशेष शाखेत सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे तर फरासखाना विभागाचे सहाय्यक आअयुक्त मिलिंद कालिदासराव पाटील यांनी विशेष शाखेत (प्रशासन-1) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (शनिवार) काढला आहे. लक्ष्मण बोराटे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या गुन्हे शाखेतील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत सहाय्यक आयुक्त पद हे रिक्त आहे.