बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार आपल्या ट्विटरवरून नेहमीच पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळं आता भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी थेट रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात जात त्यांच्यावर टीका केली आहे. औरंगाबादला जाताना, रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
https://twitter.com/
यावेळी पडळकर यांनी रोहित पवार नेहमी पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला देत असतात. त्यामुळं आपण खूप मोठे झालो आहोत सहा अविर्भावात ते असतात. मात्र त्यांनी शरद पवार यांच्या खांद्यावरुन तुम्ही तुमची उंची मोजू नका. रोहित दादा, जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशा कडक शब्दांत टीका केली आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा पडळकर आणि पवार यांच्या वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,’ असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.
यावेळी त्यांनी “राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. असे म्हटलं होतं. त्यामुळं पडळकर यांनी थेट त्यांच्या मतदारसंघात जात त्यांच्यावर टीका केली.दरम्यान, पडळकर यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील मीरजगावातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी तेथील रस्त्याची दूरवस्था व्हिडिओच्या माध्यमातून मांडली. यावेळी त्यांनी तुम्हाला तुमच्या गावातील रस्ता तयार करता येत नाही आणि देशाच्या नेतृत्वाला काय सल्ला देता अशी टीका केली. त्यामुळं आधी मतदारसंघाचा विकास करा, असा सल्लादेखील त्यांनी यावेळी पवार यांना दिला.