पुणे : बहुजननामा ऑनलाईन – तुम्हाला जर कोणतीही वस्तू आणायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागत असल्याने काही जण तस्करीच्या मार्गाने त्या वस्तू भारतात आणतात. यासंदर्भात मागच्या काही दिवसात भुईमुगाच्या शेंगांमध्ये विदेशी नोटा लपवून आणल्या असताना अजून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेने चक्क आपल्या शरीराच्या खाजगी भागातच सोने लपवून आणले आहे. याप्रकरणी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम डिपार्टमेंटने सोन्याची तस्करी केल्यामुळे एका महिलेला अटक केले आहे. या महिलेची चौकशी केली तेव्हा तिच्या शरीरात सोने लपवलेले महिला अधिकाऱ्यांना सापडले. हे प्रकरण समजताच अधिकारी आश्चर्यचकित झाले.
या महिलेला सोन्याची तस्करी केल्याचा आरोप असताना तिच्या खाजगी भागातून (गुदाशय) सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत तब्बल २० लाख रु. इतकी आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव मरियम मोहम्मद सलीम शेख असून ही महिला दुबईतून पुण्यात आली होती. दरम्यान विमानतळावर स्कॅनर असतात. त्यामुळे ती स्कॅनरमधून जाताना तेथील अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी महिलेचा तपास केला.
नंतर वैद्यकीय पथक बोलावत तिची तपासणी केली गेली. तेव्हा तिच्या खाजगी भागात (गुदाशय) सोने लपवल्याचे आढळले. आता या महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकारानंतर सर्व प्रवाशांना सक्त ताकिद देत तस्करी हा प्रकार बेकायदेशीर असल्यामुळे यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी करू नयेत, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.