पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | नगर -कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ पिकअप, रिक्षा आणि ट्रक यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात (Pune Accident News) ८ जण ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजता घडला. अपघातात दोन मुले, एक महिलेचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५), हर्षद मस्करे (वय ४) आणि काव्या मस्करे (वय ६, सर्व रा. मढ) अशी एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला आहे.
रिक्षाचालक नरेश नामदेव दिवटे (वय ६६, रा. पेडे परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि हमाल अमोल मुकुंदा ठोखे (रा. जालना) यांचाही या अपघातात जागीच मृत्यु झाला.
भाजीपाला व्यवसाय करणारे मस्करे हे पत्नी व दोन लहान मुलांना घेऊन पीकअप घेऊन जात होते. पिकअप ओतूरकडून कल्याणकडे जात असताना त्याने समोरुन आलेल्या रिक्षाला धडक दिली. या धडकेनंतर पिकअप तसाच पुढे गेला व रिक्षाच्या मागून आलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात (Pune Accident News) पिकअपमधील पाच जण आणि रिक्षामधील रिक्षाचालक व दोन प्रवासी यांचा मृत्यु झाला. दोघा प्रवाशांची अद्याप ओळख पटली नव्हती.
अपघाताची माहिती मिळाल्यावर ओतूर पोलीस ठाण्याचे (Otur Police Station) सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे
(API Sachin Kandge) व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आठही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
ओतूर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
- Pune – Nashik Highway Accident | कारवर ट्रक उलटल्याने चौघांचा मृत्यु; पुणे – नाशिक महामार्गावरील घटना, महिलेसह २ वर्षाच्या मुलीचा समावेश
- Uddhav Thackeray | धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’
- Devendra Fadnavis | फडणवीसांचा थेट आरोप, ”मराठा आरक्षणाला शरद पवार-सुप्रिया सुळेंचा सर्वाधिक विरोध”
- NCP MLA Rohit Pawar | ‘तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीबांना अडचणीत का आणता?’ MIDC वरून रोहित पवारांचा संतप्त सवाल