Uddhav Thackeray | धारावी पुर्नविकास विरोधी मोर्चात उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात, ‘अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना…’

Dharavi Redevelopment Project

मुंबई : Uddhav Thackeray | अदानींची(Adani) सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली अशी चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारवर केला. ते मुंबईत धारावी पुर्नविकास (Dharavi Redevelopment Project) मुद्द्यावर अदाणींच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करत होते.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीतील काही नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोर्चाला उपस्थित असलेल्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा
उल्लेख करत भाजपावर (BJP) निशाणा साधताना म्हटले की, वर्षा गायकवाड यांनी अदाणींना प्रश्न विचारला,
तर भाजपा उत्तर देते. नशिब समजा तुमची स्थिती अजून महुआ मोईत्रांसारखी करण्यात आली नाही.
महुआ मोईत्रांनी अदाणींना प्रश्न विचारल्यावर त्यांना निलंबित केले. नशिब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहात.
‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम चालू होता. पण, हे ‘सरकार अदाणींच्या दारी’ आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीतील संडास, बाथरूम सगळ्यांचा टीडीआर अदाणींना दिला. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा टीडीआर दिलेला नाही. कारण, बिनसवलतीच्या ढगांचा पाऊस इतका पाडला आहे की, आणखी ढगांची गरज नाही.