बहुजननामा ऑनलाईन टीम – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते बोरिस जोन्सन यांनी काल स्वीकारला. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर बोरिस जोन्सस यांनी काल आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. या मंडळात भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. यामध्ये प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्ती केले आहे. प्रीती ह्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या बॅक बोरिस अभियानाच्या प्रमुख सदस्या होत्या.
या आधी गृहमंत्री पदावर साजिद जाविद हे होते. त्यांना त्या पदावरून हटवून त्यांची नियुक्ती अर्थमंत्री पदावर करण्यात आली. आणि प्रीती पटेल यांना गृहमंत्री पद देण्यात आले. ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रीती पटेल या समर्थक आहेत. याआधीही पटेल यांनी ब्रेक्झिटच्या प्रकरणावरून सरकारवर उघडपणे टीका केली होती. भारतीय व्यक्ती ब्रिटनच्या गृहमंत्रीपदावर विराजनमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रीती पटेल या मूळच्या गुजरातच्या आहेत. प्रीती पटेल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समर्थक आहेत.
ब्रिटनमधील भारतीयांमध्ये प्रीती पटेल या लोकप्रिय असून भारतीयांच्या प्रत्येक कार्यक्रमांना प्रीती पटेल नेहमी उपस्थित राहत असतात. २०१० मध्ये प्रीती पटेल या पहिल्यांदाच संसदेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१५ आणि २०१७ मध्ये देखील त्या निवडून आल्या होत्या. याआधीही त्यांनी डेव्हिड कॅमरन सरकारमध्ये रोजगार खाते सांभाळले होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा तगडा अनुभवही आहे.