मेरठ : बहुजननामा ऑनलाईन – प्रीती हरित ह्या आयकर विभागात मुख्य आयुक्त पदावर कार्यरत असतांना त्यांनी ‘बहुजन सम्यक संघटन’ या सामाजिक संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशभर आपली ओळख निर्माण केली. प्रीती हरीत यांनी नोकरीचा तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारकडून प्रीती हरीत यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असल्याच सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रीती यांनी प्रतिष्ठेची सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्याची उत्तर प्रदेशात जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रीती हरीत या मूळच्या हरियानातील आहेत. त्या २२ व्या वर्षी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यांनी ‘बहुजन सम्यक संघटन’च्या माध्यमातून देशभर आपली ओळख निर्माण केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Preeta Harit, Principal Commissioner Income Tax Department posted in Meerut, joins Congress in presence of UP party unit chief Raj Babbar. Her resignation as Commissioner had been accepted. pic.twitter.com/beeXFoCHxi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 20, 2019