Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मुंबईला 25 वर्ष लुटले, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर आरोप (व्हिडिओ)

Pravin Darekar | uddhav thackeray looted mumbai for 25 years comments praveen darekar

अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) हे सत्ताकाळात कधीही घराबाहेर पडले नाहीत. त्यांच्या खिशाला पेन लावला नाही. गेल्‍या दहा महिन्‍यांत सत्ता नसताना शेतकरी, सामान्‍यांच्‍या प्रश्‍नावर कधीही मोर्चा काढल्‍याचे आठवत नाही. त्‍यांनी 25 वर्षे मुंबईला लुटले, आता मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ नेमली आहे. एसआयटी (SIT) कडून भ्रष्टाचाराची चौकशी होणार असल्‍याने उद्धव ठाकरे असवस्थ झाले आहेत, म्‍हणून ते येत्‍या 1 जुलैला ते मोर्चा काढत आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी येथे केली. बुधवारी रात्री येथील नेह‍रू मैदानावर भाजपाच्‍या महाजनसंपर्क सभेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) बोलत होते.

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्‍हणाले, मुंबई पालिकेत करोना काळात मोठा भ्रष्‍टाचार (BMC Corruption) झाला आहे. आपल्‍या मागे चौकशीचा ससेमिरा लागेल, म्‍हणून उद्धव ठाकरे विचलित झाले आहेत. येत्‍या 1 जुलैला मुंबईत विराट मोर्चा काढण्‍याचे त्‍यांनी जाहीर केले आहे. पण, मोर्चाचे हे ढोंग आहे. मुंबई महापालिकेत काय-काय लुटले हे चौकशीतून बाहेर येणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा काढा किंवा काहीही करा, मुंबई महापालिकेतील पैशा अन् पैशाचा हिशेब घेतला जाईल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍या लोकप्रियतेमुळे विरोधकांची ‘हवा गुल’ झाली आहे. सर्व विरोधक एकत्र येऊन हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. पण त्‍यांनी कितीही आक्रमण केले, तरी आम्‍ही त्‍यांचा मुकाबला करण्‍यासाठी सज्‍ज असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Web Title : Pravin Darekar | uddhav thackeray looted mumbai for 25 years comments praveen darekar