NCP MP Supriya Sule | ‘विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करा’ अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या -‘माझ्या भावाच्या…’ (व्हिडिओ)
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे आणि (NCP MP Supriya Sule) प्रफुल पटेल (Prafull Patel) यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्याला पक्षकार्याची संधी देण्याची विनंती केली आहे. शरद पवारांसमोरच (Sharad Pawar) त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती त्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, माझ्या दादाची सर्व इच्छा पूर्ण व्हावी हीच माझीही इच्छा आहे. दादांना संघटनेत पदावर संधी द्यायची की नाही हा संघटनात्मक निर्णय आहे. मला मनापासून आनंद हे की दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमध्ये उत्साह संचारला आहे, दादांना प्रदेशाध्यक्षपद (State President) द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच बहीण म्हणून इच्छा आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
काय म्हणाले अजित पवार?
मला विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्यात कुठलाही रस नव्हता. मात्र आमदारांनी आग्रह केला, सह्यांची मोहिम राबवली. त्यामुळे वरिष्ठ म्हणाले की तू तयार हो, त्यामुळी मी विरोधीपक्ष नेतेपद स्वीकारले. आता एक वर्ष मी हे पद सांभाळलं आहे. पण आता बास झालं, मला आता विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा मग बघा कशा पद्धतीने पक्ष चालतो ते. पण हे सर्व वरिष्ठांवर अवलंबून असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
Web Title : NCP MP Supriya Sule | supriya sules first reaction ajit pawar statement on leaving post of opposition leader
- Todays Horoscope | मिथुन, कर्क आणि कुंभ राशीच्या जातकांच्या सुख-सुविधांमध्ये होईल वाढ, जाणून घ्या इतर राशींचे भविष्य
- Micron Investment In India | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार; केंद्राकडून 300 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
- Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या
Comments are closed.